Ad will apear here
Next
‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन’चे आयोजन
‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन’च्या आयोजनाची माहिती देताना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया,पुणे शाखेचे पदाधिकारी व मान्यवर
पुणे : बांधकाम व पायाभूत क्षेत्रात होणाऱ्या चांगल्या दर्जाच्या कामाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया,पुणे सेंटरतर्फे दरवर्षी ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन’चे आयोजन केले जाते. यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर आहे. रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला आयडीएससीच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता एस.के.जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘या उपक्रमाचे हे २१ वे वर्ष असून पुरस्कार सोहळा ग्रँड शेरटन हॉटेल येथे १५ डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी  दरवर्षीप्रमाणे यंदाही बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रा.लि.ने प्रायोजक म्हणून आपले सहकार्य दिले आहे’, अशी माहिती वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशनच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सिध्दार्थ शहा यांनी दिली.

आयोजन समितीचे समन्वयक सुनिल मते म्हणाले, ‘या उपक्रमामध्ये विविध गटातील पुरस्कार असतील.त्यामध्ये रेसिडेन्शियल (हाऊसिंग कॉम्प्लेक्स),रेसिडेन्शियल बंगलो, रो हाऊसेस,स्टँड अलोन बिल्डिंग्स, रेसिडेन्शियल (अफॉर्डेबल हाऊसिंग),कमर्शियल (मॉल्स,ऑफिसेस,इन्स्टिट्युशन्स,हॉटेल्स,हॉस्पिटल्स,थिएटर्स),वेल इक्विप्ड वेल मेकनाइज्ड साईट, इंडस्ट्रीयल,इन्फ्रास्ट्रक्चर (ब्रिजेस,फ्लायओव्हर्स,ईएसआर इत्यादी) गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट,पब्लिक वर्क, ज्युरीज रेकमंडेशन आणि यंग आंत्रप्रेन्युअर या पुरस्कारांचा समावेश आहे’.
 
बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव म्हणाले ‘हा प्रतिष्ठित पुरस्कार असून बांधकाम व पायाभूत क्षेत्रात सध्या चालू असलेल्या कामातील उत्कृष्टता दर्शविते.अशा कामांना आम्ही या उपक्रमाद्वारे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी सर्व आघाडीचे बांधकाम व्यावसायिक,कॉन्ट्रॅक्टर्स व या क्षेत्राशी निगडीत कंपन्या या उपक्रमात सहभागी होतात’.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZRCBH
Similar Posts
‘बीएआय’तर्फे व्ही. जी. जाना यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे : बांधकाम क्षेत्रात होणार्‍या चांगल्या कामाची दखल घेण्याच्या हेतूने बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे वार्षिक वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार सोहळा नुकताच पुण्यात झाला.
‘बीएआय’ पुणेचा पदग्रहण समारंभ उत्साहात पुणे : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरचा (बीएआय) पदग्रहण समारंभ नुकताच रेसिडेन्सी क्लब येथे उत्साहात झाला.
पुणे प्राईड पुरस्कार सोहळा पुणे : रेसिडेन्सी क्लबला नुकतीच २६ वर्ष पूर्ण झाली असून, संस्थेचा 'पुणे प्राइड अॅवॉर्डस्' हा दिमाखदार सोहळा नऊ डिसेंबर रोजी पार पडला. हा सोहळा 'रेसिडेन्सी क्लब ब्रह्माकॉप'चे अध्यक्ष आर. के. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language